Journalist Award : सकाळचे धवन, पोतदार, चोबे, इधाटे व जोशी यांना पत्रकार पुरस्कार

उदगीर येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय व मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले.
Journalist Award
Journalist Awardsakal

उदगीर, (जि. लातुर) - येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय व मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असुन, विकास व शाश्वत विकास वार्ता गटात फुलंब्री, जि. छत्रपती संभाजी नगर येथील बातमीदार नवनाथ इधाटे यांना प्रथम, तर सिल्लोड येथील बातमीदार सचिन चोबे यांना द्वितीय, उत्कृष्ट वार्ता गटात उजनी (ता. औसा) येथील बातमीदार केतन धवन यांना, मराठवाडा स्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने शोधवार्ता गटात जळकोट (जि. लातूर) बातमीदार विवेक पोतदार यांना प्रथम तर निडेबनचे (उदगीर) बातमीदार संतोष जोशी यांना राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार उत्कृष्ट वार्ता गट प्रथम पुरस्कार सकाळचे उजनी ता.औसा जिल्हा लातूर येथील प्रतिनिधी केतन ढवण यांच्या 'दुभंगून जाता-जाता अभंग  झालो! या बातमीस जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ रोख पाच हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, शोधवार्ता गटात तृतीय पुरस्कार सकाळचे सिल्लोड बातमीदार सचिन चोबे यांच्या 'आॅक्सीजन यंत्रणा असुन अडचन नसुन खोळंबा' या बातमीस कै. व्यंकटराव मोगले यांच्या स्मरर्णार्थ दोन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तर विकास व शाश्वत विकास वार्ता गट प्रथम पुरस्कार सकाळचे  फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील बातमीदार नवनाथ इधाटे यांच्या 'महिला कुटुंबालाच नव्हे तर समाजाला दिशा देते' या बातमीस कै. गुणवंतराव सावरगावे यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असा जाहीर झाला आहे.

येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार शोधवार्ता गटामधुन सकाळचे जळकोट बातमीदार विवेक पोतदार यांच्या 'उमेदमुळे शेंद्रीय शेतीला प्रोत्साहन' या बातमीला प्रथम तर तृतीय निडेबन येथील सकाळचे बातमीदार संतोष जोशी यांच्या 'व्यवसायाकरिता कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला मिळू शकते जातीचे प्रमाणपत्र' या बातमीस जाहीर झाला झाला आहे. याबद्दल या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com