esakal | न्यायीक व कर्मचारी वर्ग आळीपाळीने काम करणार : न्या. धोळकिया

बोलून बातमी शोधा

फोटो

 प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशानुसार कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालय येथे ता. २३ ते ता. ३१ पर्यंत आळीपाळीने न्यायीक व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहे.

न्यायीक व कर्मचारी वर्ग आळीपाळीने काम करणार : न्या. धोळकिया

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : उच्च न्यायालयाच्या परिपत्रकानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशानुसार कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालय येथे ता. २३ ते ता. ३१ पर्यंत आळीपाळीने न्यायीक व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहे.
 
कोरोना हा साथीचा रोग संसर्गजन्य 

कोरोना हा साथीचा रोग संसर्गजन्य असून त्याचा फैलाव टाळण्यासाठी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत सुध्दा बदल करण्यात आला आहे. सध्या न्यायादानाची वेळ ही सकाळी ११ ते दुपारी दोन अशी करण्यात आली आहे. या वेळेत फक्त रिमांड जामीन बाबतचे व अत्यावश्यक दावे ज्यामध्ये सात दिवसांच्या आत चौकशीसाठी ठेवणे आवश्यक आहे. अशीच प्रकरणे ठेवण्याचे निर्देश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी सर्व न्यायाधीशांना दिले आहेत.

हेही वाचातुराट्यांचे सरण पेटवून शेतकऱ्याने घेतली उडी...

पक्षकारांनी काळजी करू नये

पक्षकारांनी आपआपल्या प्रकरणांच्या तारखा घेण्यासाठी न्यायालयात येऊ नये व गर्दी करू नये असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे. वकीलांनी व पक्षकारांनी त्यांच्या प्रकरणांच्या तारखा या जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावरून घ्याव्यात व कोणताही पक्षकार सध्या तारखेला न्यायालयात हजर राहिला नाही. तर त्याविरुद्ध कोणताही आदेश केला जाणार नाही. आणि सर्व प्रकारच्या प्रकरणात चार आठवड्यानंतरच्या तारखा देण्यात येणार आहेत. तरी पक्षकारांनी काळजी करू नये. सर्व पक्षकार आणि वकिलांनी सहकार्य करावे व लोकसंपर्क टाळावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी केले आहे.

एप्रिल ११ ची राष्ट्रीय लोकअदालत पुढे ढकलली

नांदेड : राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ता. ११ एप्रील रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय, नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. परंतू कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता ही लोकअदालत रद्द करुन ती ता. २५ एप्रील रोजी आयोजीत करण्यात आली आहे.

येथे क्लिक करा मनोरूग्णांना घातली अंघोळ, केली कटींग दिले नवे कपडे

तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे सर्वसामान्य किमान कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात येणारे सर्व कायदेविषयक शिबीर, कार्यक्रम व मोबाईल व्हॅन इत्यादी कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याचे कळविले आहे. याची सर्व पक्षकारांनी दखल घ्यावी व ता. २५ एप्रील रोजी होणाऱ्या लाकअदातीत जास्तीत जासत प्रकरणे ठेवून निकाली काढावे असा आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिय व सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे.