कॉपी पकडल्यामुळे पाचव्या मजल्यावरून उडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

औरंगाबाद - महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर सचिन वाघ (वय १९) याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात मंगळवारी (ता. १०) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. यात सचिन गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पेपरला साडेनऊला सुरवात झाल्यानंतर सव्वादहाच्या सुमारास सचिनला कॉपी करताना पर्यवेक्षकाने पकडले. प्राचार्यांनी वडिलांचे मोबाईल नंबर घेतले. मात्र, सचिनने दिलेल्या वडिलांच्या तिन्ही नंबरवर संपर्क होऊ शकला नाही. महाविद्यालयाने हे प्रकरण सचिनकडून लिहून घेत सही घेतली.

औरंगाबाद - महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर सचिन वाघ (वय १९) याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात मंगळवारी (ता. १०) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. यात सचिन गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पेपरला साडेनऊला सुरवात झाल्यानंतर सव्वादहाच्या सुमारास सचिनला कॉपी करताना पर्यवेक्षकाने पकडले. प्राचार्यांनी वडिलांचे मोबाईल नंबर घेतले. मात्र, सचिनने दिलेल्या वडिलांच्या तिन्ही नंबरवर संपर्क होऊ शकला नाही. महाविद्यालयाने हे प्रकरण सचिनकडून लिहून घेत सही घेतली. मात्र, आजचा पेपर देता येणार नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले. त्यानंतर तो पाचव्या मजल्यावरील जिन्यावर जाऊन थांबला. सुमारे दहा मिनिटे तिथेच थांबून त्याने काचेच्या खिडकीतून खाली उडी मारली.

Web Title: jump from the fifth floor in aurangabad

टॅग्स