कनिष्ठ निवासी डॉक्‍टर सामूहिक रजेवर

Doctor-Strike
Doctor-Strike

औरंगाबाद - डॉक्‍टरांना सलग दोन दिवस झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) २०४ कनिष्ठ निवासी डॉक्‍टरांनी मंगळवारी (ता. १६) सामूहिक रजेचे हत्यार उपसले. परंतु, पंधरा दिवसांत सुरक्षेबाबतच्या मागण्या पुर्ण करु असे घाटी प्रशासनाने आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेत मंगळेवारी रात्री दहापर्यंत कामावर परतू, असे पत्र डॉक्‍टरांच्या मार्ड संघटनेने दिले आहे.

रविवारी (ता. १४) रात्री वॉर्ड क्रमांक आठ, नऊमध्ये दोन डॉक्‍टरांना तर सोमवारी (ता. १५) दुपारी वॉर्ड क्रमांक पाचमध्ये डॉक्‍टर व रुग्णात धूमश्‍चक्री झाली. या घटनांचा निषेध नोंदवत निवासी डॉक्‍टरांनी मंगळवारी सकाळी आठपासून एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. मारहाणीच्या प्रकारानंतर सोमवारी सुरक्षेबाबत त्यांनी घाटी प्रशासनाकडे मागण्या केल्या. यावर मागण्यांवर उपाययोजना काय याची माहिती घेऊनच आम्ही बुधवारी (ता. १७) सकाळी कामावर परतण्याचा निर्णय घेऊ, असे आंदोलक डॉक्‍टरांनी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना सांगितले. दरम्यान, मंगळवारी रात्री आठला घाटी प्रशासनाला मार्ड संघटनेने कामावर रात्री दहापर्यंत हजर होऊ असे अधिकृत पत्र दिले. त्यामूळे डॉक्‍टर रात्रीतून कामावर हजर राहतील अशी शक्‍यता आहे.

ऐक्‍यांशी डॉक्‍टर कामावर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २८५ कनिष्ठ निवासी (जे.आर. एक, दोन, तीन) डॉक्‍टर आहेत. त्यापैकी दोनशे चार डॉक्‍टर सामूहिक रजेवर आहेत, तर ८१ डॉक्‍टर मंगळवारी कामावर हजर होते.

रुग्णसेवेवर अंशतः परिणाम 
कनिष्ठ निवासी डॉक्‍टरांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर कनिष्ठ निवासी डॉक्‍टर सामुदायिक रजेवर आहेत. यामुळे रुग्णसेवेवर अंशतः परिणाम झाला; पण तरीही प्रसूतीसह ४४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. 

डॉक्‍टरांची मनधरणी..
सामूहिक रजा घेतलेल्या डॉक्‍टरांची उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे व प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी समजूत काढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com