काकासाहेबांचे कुटुंबीय अद्यापही मदतीपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनासाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. याला वर्ष होऊनही जाहीर केलेली मदत हुतात्म्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही.

औरंगाबाद - मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनासाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. याला वर्ष होऊनही जाहीर केलेली मदत हुतात्म्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. ही मदत त्वरित द्यावी; अन्यथा जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांनी दिला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी काकासाहेब शिंदे हुतात्मा झाले. जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा परिषदेतर्फे 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले; मात्र त्यानंतर प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना त्याचा विसर पडला. याविषयी आपण सातत्याने आवाज उठवूनदेखील आजपर्यंत जाहीर केलेली मदत देण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. महापालिकेने जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना मदत दिली तशी जिल्हा परिषद प्रशासनाला सुबुद्धी सुचेल का? असा सवाल श्री. वालतुरे यांनी केला आहे. जाहीर केल्याप्रमाणे 10 लाख रुपयांची मदत तत्काळ दिली नाही, तर जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा मधुकर वालतुरे यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kakasaheb family still deprived of help