esakal | लातूर-कळंब मार्ग झाला धोकादायक; वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

latur

लातूर-कळंब मार्ग झाला धोकादायक; वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): लातूर- कळंब हा अत्यंत रहदारीचा असलेल्या रस्त्याचे काम मागील तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. यात संबंधित बांधकाम विभाग व कंत्राटदारांच्या नियोजन शून्यतेमुळे जागोजागी रस्ता खोदून मुरूम मिश्रित माती टाकण्यात आली आहे. विशेषतः या मार्गावरील डिकसळ ते कोथळा रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर चिखल झाल्याने प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.

लातूर ते कळंब मार्गावरील डिकसळ ते कोथल्यादरम्यान, रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला आहे. जागोजागी रस्त्याचे खोदकाम करून मुरूम मिश्रित माती टाकल्याने रस्त्यावर चिखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः १० किलोमीटर अंतराचा हा रस्ता असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! आजोळी आलेल्या श्रावणीचा पावसाने अंगावर भिंत पडल्याने मृत्यू

रस्त्याची कामे करताना एका बाजूचे काम करून दुसरी बाजू वाहतुकीला सुरळीत ठेवणे अपेक्षित असते. परंतु, बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्यावरून रोज अनेक दुचाकीस्वार घसरून किरकोळ जखमी होत आहेत. तर चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जात आहेत.

loading image