Kalamb News : कळंबमध्ये पेट्रोल पंपावर दरोडा; कोयत्त्याचा धाक दाखवत सव्वातीन लाखाची रोकड लुटली

येरमाळा रस्त्यावरील हासेगाव (केज) ग्रामपंचायत हद्दीतील राजश्री पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून चार चोरट्याने ३ लाख २८ हजार रुपयाची रोकड लुटल्याची घटना घडली आहे.
kalamb petrol pump robbery 3 lakh rs stolen police cctv footage
kalamb petrol pump robbery 3 lakh rs stolen police cctv footageSakal

कळंब : येरमाळा रस्त्यावरील हासेगाव (केज) ग्रामपंचायत हद्दीतील राजश्री पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून चार चोरट्याने ३ लाख २८ हजार रुपयाची रोकड लुटल्याची घटना घडली आहे.ही घटना रविवार (ता.२८) रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी घडली आहे.दरम्यान चोरट्यांनी अवघ्या चार मिनिटात पेट्रोल पंपावर दरोडा टाकून रोकड पळविल्याची घटना सीसीटिव्ही फुटेजवरून उघड होत आहे.

या प्रकरणी रात्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान भंडारी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.यात म्हटले की,येरमाळा रस्त्यावरील हासेगाव ग्रामपंचायत हद्दीत हिंदुस्थान पेट्रोल पंप आहे.

रविवारी रात्री दुचाकीवरून चार दरोखोर हातात कोयते घेवून ११ वाजून ५२ मिनिटांनी आले होते. कोयत्यचा धाक दाखवून पंपावरील कामगारांना ऑफिसच्या चाव्याची मागणी केली.काही कामगारांनी चाव्या तत्काळ न दिल्यामुळे कोयते उगारून धमकावण्यात आले.

घाबरलेल्या अवस्थेत कामगारांनी चाव्या दिल्या. ऑफीस मधील असलेल्या तीन कॅश काऊंटर मधून चोरट्यांनी ३ लाख २८ हजार रुपये घेवून दरोडा टाकला.कामगारांनी दरोडा टाकल्याची माहिती राजश्री पेट्रोल पंपांचे भगवान भंडारी याना माहिती दिली.

भंडारी यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करून तत्काळ पोलिस दाखल झाले.दरम्यान गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी तत्काळ अतिरिक्त पोलिस अधीक्षक गौर हसन,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार,पोलिस निरीक्षक सुरेश साबळे आदी पोलिस कर्मचारी दाखल होऊन गुन्ह्याची माहिती घेतली.दरोडेखोर हे आपापसात मराठीत बोलत होते.

दुचाकीवरून चार दरोडेखोर ११ वाजून ५२ मिनिटांनी आले.११ वाजून ५६ मिनिटांनी म्हणजे अवघ्या चार मिनिटात सव्वातीन लाखाची रोकड लुटल्याची घटना पंपावरील सीसीटिव्ही फुटेज वरून स्पष्ट होत आहे.गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com