esakal | शिवसेनेच्या आमदाराला मंत्रालयात आली चक्कर, आणि मग....
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

जनतेच्या कामासाठी धावपळ करताना कळंबचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांना मंत्रालयातच अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्यावर तात्काळ उपचार करून, त्यांना सेंट जॉर्ज रूग्णालयात तपासण्या करण्यासाठी पाठवण्यात आले.

शिवसेनेच्या आमदाराला मंत्रालयात आली चक्कर, आणि मग....

sakal_logo
By
मंगेश यादव

कळंब (जि. उस्मानाबाद) : आपल्या मतदारसंघातील जनतेची कामे पूर्ण करण्यासाठी आमदार तहान-भूक हरपून काम करत आहेत, असे चित्र मंत्रालयात बघायला मिळाले. कळंबचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांचेच हे उदाहरण आहे.

आपल्या मतदारसंघातील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयातील विविध दालनांमधून फिरता फिरता आरोग्यमंत्र्याच्या कार्यालयात आलेल्या आमदार पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. दरदरून घाम फुटला. तिथेच त्यांच्यावर तात्काळ प्रथमोपचार करण्यात आले. 

नाश्ताही न करता मंत्रालयात धावपळ

याबद्दल अधिक माहिती अशी, की उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातील आमदार कैलास पाटील आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेत व त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मतदारसंघातून रविवारी रात्री उशिरा मुंबईला गेले. सोमवारी (ता. १०) सकाळी नाश्ताही न करताच साडेदहा वाजेपासून ते मंत्रालयात दाखल झाले. 

धनंजय मुंडे यांनी कढून दिलं विमानाचं तिकीट आणि जवान गेला सीमेवर

मतदार संघातील जनतेची विविध विभागांत कामे असल्यामुळे सगळीकडे फिरताफिरता त्यांना जेवणाचीही फुरसत मिळाली नाही. 

शेवटी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दालनात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तात्काळ बैठकीच्या दालनात नेण्यात आल्यावर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. कामाची दगदग व उपाशीपोटी असल्याने त्यांना अस्वस्थ होउन घाम मोठ्या प्रमाणात आल्याचे निष्पन्न झाले.

पहा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स

त्यानंतर मंत्रालयाच्या नजीक असलेल्या सेंट जाॅर्ज या हाॅस्पीटलमध्ये जाऊन रक्तदाब व साखर यांची तपासणी केली. अगदी सकाळपासून कांहीही खाल्ल्याने साखर कमी झाल्याने आमदार पाटील यांना अस्वस्थ जाणवत असल्याचे सांगितले. 

रुग्णालयातही कामाचा ध्यास

दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ११) सेंट जॉर्ज रूग्णालयात कांही तपासणी करण्यासाठी गेल्यावर त्यांना कळाले की, याच परिसरात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांचे कार्यालय आहे. डॉ.लहाने अन्य बैठकीला जात असल्याचे आमदार पाटील यांना समजताच त्यांनी वाटेतच गाठून डॉ.लहाने यांची भेट घेतली. 

अविश्वासाचा असा विजय

उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा हस्तांतर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र देण्याची त्यांनी मागणी केली. त्यानंतर सर्व तपासण्या केल्यानंतर त्या़ंनी उर्वरीत कामांचा निपटारा करण्यासाठी पुन्हा मंत्रालय गाठले.