esakal | कळंब तालुक्यातील १९ हजार शेतकऱ्यानी नोंदविला ऑनलाइन पीकपेरा
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

कळंब तालुक्यातील १९ हजार शेतकऱ्यानी नोंदविला ऑनलाइन पीकपेरा

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (जि. उस्मानाबाद) : तालूक्यातील ६४ हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी १९ हजार ८९८ शेतकऱ्यानी आपल्या पिकाची सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन नोंदणी केली असून ई-पीक पहाणी नोंदणीत कळंब तालुका टॉपवर आहे. सुरवातीच्या काळात शासनाने खुले केलेले पीक पहाणी ऍप शेतकऱ्याची डोकेदुखी वाढविणारे बनले होते, मात्र मागच्या चार दिवसांपूर्वी हे ऍप तांत्रिकदृष्ट्या सक्षम केल्याने आता हे ऍप सुरळीत सुरू असल्याने ऑनलाइन पीकांची नोंदणी चटकन होत आहे.

माझी शेती,माझा सातबारा,मीच नोंदविणार माझा पिकपेरा हा उपक्रम शासनाने १५ ऑगष्ट पासून सुरू केला असून सातबारा उताऱ्यावर पिकांच्या नोंदी करण्यासाठी इ पीक पहाणी ऍप लॉंच केले आहे.ई-पीक पहाणी अंतर्गत तालुक्यातील ६४ हजार ७४४ शेतकऱ्यांपैकी आतापर्यत १९ हजार ८९८ शेतकऱ्यानी आपल्या शेतातील पिकाची ऑनलाइन नोंदणी केली आहे.तर २१ हजार २२५ शेतकऱ्यानी रजिष्टेशन केले आहे.१ हजार ४२९ शेतकरी ऑनलाइन नोंदणीत फेल झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: महेश रोकडे बारामतीचे नवीन मुख्याधिकारी

ई-पीक पहाणी मोबाईल ऍपची माध्यमातून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची अचूक नोंदणी करावी, यासाठी तहसीलदार रोहन शिंदे, मंडळ अधिकारी, तलाठी आवश्यकते मार्गदर्शन करीत आहेत.ई-पीक पहाणी मोबाईल ऍपद्वारे शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकाची माहिती देत आहेत.त्यामुळे गावनिहाय पिकाची अचूक माहिती उपलब्ध होत आहे. 

पिकाच्या नोंदणीला मुदतवाढ;

शासनाने ई पीक पहाणी ऍप १५ ऑगष्टपासून कार्यन्वित केले होते.पीक पाहणी ऍपद्वारे पिकाच्या नोंदणीसाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती.सुरवातीच्या काळात काही दिवस हे ऍप कसे हाताळायच हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नव्हते.त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली होती.महसूल विभागाने व्यापक प्रमाणात जनजागृती केल्यामुळे शक्य झाले.शासनाने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन पिकाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणे शक्य नसल्याचे वरिष्टना ही माहिती अवगत केल्यामुळे शासनाने आता ३० सप्टेंबरपर्यत पिकाची नोंदी करण्यासाठी मुदत दिली आहे.

loading image
go to top