शिळ्या खिचडीतून चौघांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

कळमनुरी (जि. हिंगोली) - शिळी खिचडी खाल्ल्यामुळे शहरातील कुटुंबामधील चौघांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी घडली. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरांमधील शेख मुख्तार शेख बिबन यांच्या घरातील सदस्यांनी रात्री उरलेली खिचडी आज खाल्ली. त्यामुळे त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. शेजारच्यांनी शेख मुख्तार शेख बिबन (वय 45), शेख रमीजा शेख मुख्तार (वय 25), शेख नासीर शेख मुख्तार (वय 8), शेख नोविद शेख मुख्तार (वय 6) यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने यांनी उपचार केले.
Web Title: kalamnuri hingoli news poisoning