मुलीच्या विवाहापूर्वी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

कळमनुरी - शहरातील अल्पभूधारक शेतकरी माधव धुरपत खरवडे (वय 45) यांनी सोमवारी (ता. 12) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. माधव खरवडे यांची पारडी शिवारात दीड एकर शेती असून बॅंकेचे कर्ज आहे.

कळमनुरी - शहरातील अल्पभूधारक शेतकरी माधव धुरपत खरवडे (वय 45) यांनी सोमवारी (ता. 12) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. माधव खरवडे यांची पारडी शिवारात दीड एकर शेती असून बॅंकेचे कर्ज आहे.

सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त होते. त्यातच त्यांच्या दुकानातून आठ दिवसांपूर्वी दीड लाख रुपये चोरीस गेले. पुढील आठवड्यात त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह होता. आज दुपारी शेतातून ते जेवणासाठी घरी आले. आराम करण्यासाठी माडीवर जात असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. माडीवर त्यांनी गळफास घेतला. परिसरातील नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविले. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या मागे आई, पत्नी, चार मुली असा परिवार आहे.

Web Title: kalamnuri news marathwada news farmer suicide