

Vote fraud helped Mahayuti win, says Kalyan Kale.
sakal
कन्नड : केवळ मतांची चोरी झाल्यानेच महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले, असा गंभीर आरोप खासदार कल्याण काळे यांनी महायुती सरकारवर केला. त्यांच्या कारभारामुळे हे सरकार लोकांच्या नजरेतून उतरले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कन्नड शहरात माजी आमदार नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे दिवाळी स्नेहमिलन व कार्यकर्ता बैठक शनिवारी रोजी वाणी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली.