पोलिसांकडून ‘कल्याण’च्या मिलनचे आॅपरेशन 

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मटका जुगारासह आॅनलाईन लॉटरी जुगाराचे जाळे पसरत चालले आहे. या अवैध धंद्याचे आॅपरेशन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी करत जिल्हाभरात कारवाई करत पाऊण लाखाचा मुद्मेमाल जप्त केला.

नांदेड : शहर व जिल्ह्यात कल्याण व मिलन नावाच्या मटका जुगारासह आॅनलाईन लॉटरी जुगाराचे जाळे पसरत चालले आहे. या अवैध धंद्याचे आॅपरेशन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी करत जिल्हाभरात कारवाई करत पाऊण लाखाचा मुद्मेमाल जप्त केला. यावेळी पोलिसांनी २५ जुगाऱ्यांना अटक केली. हे ‘कल्याण’ आॅपरेशन व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी केले. 

शहर व जिल्ह्यात मटका, जुगार आदी अवैध धंदे चालु देणार नाही. त्यासाठी संबंधीत ठाणेदारांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा सुचना त्यांनी वेळोवेळी गुन्हे संदर्भात बैठकीत ठाणेदारांना व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परंतु अवैध धंदे बंद करणे तर सोडाच उलट या धंद्याचे पाळेमुळे खोलवर गेले असल्याचे दिसुन येते. शहर व जिल्ह्यात मटका राजरोसपणे सुरू असल्याचे तक्रार पोलिस अधीक्षक श्री. मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्याकडे प्राप्त झाल्या. यावरून त्यांनी ठाणेदारांना समज देत या धंद्यावर आळा घालण्याच्या सुचना दिल्या. यावरुन पोलिसांनी शहर व जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १४) एकाचे वेळी वेगवेगळ्या पथकामार्फत मटका, जुगार व आॅनलाईन लॉटरीवर छापे टाकले. यावेळी पोलिसांनी जवळपास पाऊन लाखाचा मुद्मेमाल जप्त करून दहा जुगाऱ्यांना अटक केली आहे. 

हेही वाचाशेतकऱ्याने कोवळ्या मुलासह निवडला असा मार्ग, की...

शहरातील सर्वच ठाण्याच्या हद्दीत कारवाई 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हडको येथील अण्णाभाऊ साठे चौकातून आॅनलाईन लॉटरी या जुगारावर कारावई करत अनिल विश्‍वनाथ राजगिरवार याला अटक केली. त्याच्याकडून २५ हजार ३४० रुपयाचा ऐवज जप्त केला. त्यानंतर भाग्यनगर, वजिराबाद, शिवाजीनगर, विमानतळ आणि इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाया करून जुगाऱ्यांना अटक केली. कल्याण, टाईम बाजार, आॅनलाईन लॉटरी आणि मिलन डे नावाचे मटका बुक्या उद्ध्वस्त केल्या. या प्रकरणी जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुन्हा एकदा पोलिस अधीक्षक श्री.मगर यांनी ठाणेदाराचे कोन टोचल्याचे बोलल्या जाते.

येथे क्लिक कराशिवलिंगेश्‍वर भजन मंडळाचा असाही अनोखा उपक्रम : कसा, ते वाचायलयाच पाहिजे

हे आहेत जुगारी 

अनिल विश्‍वनाथ राजगीरवार, तुलजेश यादव, संतोष टोकलवार, राजेंद्र ठाकूर, मोहमद साजीद, अजिंक्य कांबळे, रामकृष्ण बरडे, अनमोल हत्तीअंबीरे, सुखदेव दत्ता तारु, अब्बासभाई, ओमप्रकाश रौत्रे, अनिल जाधव, सुभाष बैस, मंगेश जोंधळे, लक्ष्मण जाधव, राजू भूदारकर, शेख इमाम शेख रसुल, साईनाथ रौत्रे, गणेश यादव, गजानन कळकेकर, संतोष भारती, अक्षय खिल्लारे, सखाराम शिंदे, नथुन कुटल्यावाले. 
     
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyan milan operation by police Nanded police