परभणीत 24 ऑगस्टला होणार कन्हैयाकुमारची सभा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

परभणी : 'संविधान बचाओ, देश बचाओ' या उपक्रमाअंतर्गत दिल्लीतील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यांची परभणीत 24 ऑगस्टला तर पाथरीत 25 ऑगस्टला जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती संयोजकांनी शुक्रवारी (ता.17) पत्रकार परिषदेत  दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप, शेकाप,भारिप बहुजन महासंघ यांच्यासह विविध 52 संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने परभणीत कन्हैयाकुमार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 'संविधान बचाओ, देश बचाओ' उपक्रमात कुमार यांनी देश यात्रा सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून परभणीतील जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी (ता.24) दुपारी दोन वाजता तर पाथरी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर 25 ऑगस्टला सकाळी 11 वाजता कन्हैया कुमार यांची सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष

आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार विजय भांबळे, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ.विलास बाबर, कॉ.किर्तीकुमार बुरांडे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, प्रविण कुनकुटे, रवि सोनकांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Kanhaiyakumar meeting on August 24 in Parbhani