Kannad Crime : कन्नडमध्ये गुंगीकारक गोळ्यांची अवैध विक्री उघड; सराईत आरोपी अटक, ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

कन्नड बसस्थानक परिसरात गुप्त माहितीच्या आधारे धाड; गुंगीकारक ‘नायट्रोसुन-१०’ गोळ्यांसह सराईत आरोपी अटकेत, ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Enforcement Drive: Kannad Town Police Bust Prohibited Sedative Pills Racket

Enforcement Drive: Kannad Town Police Bust Prohibited Sedative Pills Racket

Sakal
Updated on

कन्नडमध्ये गुंगीकारक गोळ्या विकणारा गजाआड; ७६ हजारांच्या मुद्देमालासह पोलिसांची मोठी कारवाई.

​कन्नड, ता.१७ (बातमीदार)

शहरात अवैधरित्या गुंगीकारक औषधांच्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला कन्नड शहर पोलिसांनी रविवारी (ता. १७) धाडसी कारवाई करत अटक केली. आरोपीकडून 'नायट्राझेपाम टॅब. नायट्रोसुन-१०' (Nitrazepam Tab. Nitrosun-10) या नशा आणणाऱ्या ४१ गोळ्या, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ७६ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निरजील मधुकर सुरे (वय २८, रा. नवजीवन कॉलनी, कसबा, कन्नड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना, बसस्टँड रोड परिसरात एक व्यक्ती नशायुक्त गोळ्या विकण्यासाठी उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानुसार महसूल विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि पंचांना सोबत घेऊन बसस्टँड परिसरात छापा टाकण्यात आला. ​संशयित आरोपी निरजील सुरे याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कोणतेही प्रिस्क्रिप्शन किंवा वैध परवाना नसलेल्या 'नायट्रोसुन-१०' गोळ्यांची पाकिटे आढळली. पोलिसांनी औषधांसह त्याची सुझुकी अँक्सेस दुचाकी आणि विवो कंपनीचा मोबाईल जप्त केला. औषध निरीक्षकांनी प्राथमिक पडताळणीत या गोळ्या गुंगीकारक आणि नशा निर्माण करणाऱ्या श्रेणीतील असल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, एनडीपीएस (NDPS) कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. ​ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजित अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. बी. सानप, सपोनि कुणाल सूर्यवंशी, तहसीलदार सारिका भगत, सहाय्यक फौजदार नासेर पठाण व पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com