Crime News : चपलांनी मारहाण करत महिलांनी काढली तरुणाची धिंड; चौदा महिलांवर गुन्हा दाखल

कन्नड शहरात खळबळ, चौदा महिलांवर गुन्हा दाखल, जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर तरुणाविरुद्ध ॲट्रॉसिटी.
Bapu Gawali
Bapu Gawalisakal

कन्नड - मक्ररणपूर येथील माजी सरपंच व सरपंचांची जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमण केल्याबाबत तक्रार केल्याचा राग धरून एका तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची १५ महिलांनी चपलांनी मारहाण करत अक्षरशः धिंड काढत पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी पंधरा महिलांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर तरुणाविरुद्ध मंगळवारी (ता. २५) ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये उषाबाई विनायक सोनवणे, सीमा अमोल सोनवणे, मीराबाई रामलाल पवार, उषाबाई (आडनाव माहिती नाही), वंदना प्रभाकर पवार, सुनीता कृष्णा गायकवाड, रेखा प्रकाश पवार, संगीता पुंडलिक काकडे, कविता संजय पवार, लताबाई सोनवणे, रेखाबाई गायकवाड, सुमित्रा बनकर व इतर पुरुष अशा १५ जणांचा समावेश आहे. तर बापू शांताराम गवळी (वय-३४, रा. मक्ररणपूर, ता. कन्नड) असे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे.

कन्नड ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी सांगितले की, माहिती अधिकार कार्यकर्ते बापू शांताराम गवळी (वय-३४, रा. मक्ररणपूर, ता. कन्नड) यांनी कन्नड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, सरपंच सना अस्लम शेख व माजी सरपंच विनायक सोनवणे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमण, रेशनचा काळाबाजार या संदर्भात तक्रारी केल्या आहे.

त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकशी करून रेशन दुकानाचा परवाना रद्द केला. तसेच सरपंच सना शेख यांनी गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्या कारणामुळे मंगळवारी (ता. २५) दुपारी सव्वा बारा वाजता एका जनरल स्टोअरमध्ये बसलेला असताना गुन्हा दाखल झालेल्या महिलांनी हल्ला करून चपला, लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत धिंड काढली.

या तक्रारीवरून कन्नड शहर ठाण्यात विविध कलमान्वये १५ महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहायक फौजदार जे. पी. सोनवणे, एस. के. तायडे हे करीत आहेत.

दरम्यान, याच प्रकरणात मिराबाई रामलाल पवार (वय-४०, रामकरणूपर) यांनी कन्नड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, बापू गवळी यास तू माझ्या नवऱ्याला का मारतो, असे विचारले असता जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच उजवा हात पिरगळला. या फिर्यादीवरून बापू गवळी यांच्याविरुद्ध अॕट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, गवळी यास अटक करण्यात आली. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकूरवाड हे करीत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सामाजिक कार्यकर्ते बापू गवळी यांची महिलांनी चपलांनी मारहाण करीत अक्षरशः धिंड काढली.

सदरील मारहाण सुरू असताना कुणीही नागरिकमध्ये पडले नाही. अनेकांनी मात्र, मोबाईलमध्ये चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com