Kannad News : गाव करेल ते राव करेल का? दिलेला शब्द पाळत पराभूत उमेदवाराला निवडून आणत सरपंचपद केले बहाल

कन्नड तालुक्यातील घुसुर ग्रामस्थांनी अडीच वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळत पराभूत महिला उमेदवारासाठी पोटनिवडणूक घडवून आणली व पराभूत उमेदवाराला निवडून आणून सरपंच पद बहाल केले.
Nita Rathod
Nita Rathodsakal

कन्नड - महाराष्ट्रामध्ये परस्परांना धोका देऊन, कुरघोडी करत राजकारणी सत्तेचे राजकारण करत आहेत. मात्र कन्नड तालुक्यातील घुसुर ग्रामस्थांनी अडीच वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळत पराभूत महिला उमेदवारासाठी पोटनिवडणूक घडवून आणली व पराभूत उमेदवाराला निवडून आणून नीता रामेश्वर राठोड यांना सन्मानाने (ता. 17)सरपंच पद बहाल केले.

या संदर्भातली रंजक माहिती अशी की, घुसुर ग्रामपंचायतची निवडणूक 2021 मध्ये झाली. या निवडणुकीत एकनिष्ठ पॅनलला बहुमत मिळाले मात्र सरपंच पदाच्या उमेदवार नीता रामेश्वर राठोड यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव झाला.

एकनिष्ठ पॅनलच्या त्या उमेदवार होत्या. हा पराभव ग्रामस्थांच्या व एकनिष्ठ पॅनलच्या जिव्हारी लागला. एकनिष्ठ पॅनलचे बहुमत असल्याने कविता राहुल काळे या सरपंच झाल्या. परंतु यावेळेस आपल्या सरपंच पदाच्या उमेदवार नीता रामेश्वर राठोड यांचा पराभव झाला.

पुढील अडीच वर्षांनंतर सरपंच निता राठोड याच होतील असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. असा ठराव ग्रामस्थांनी मंजूर केला. या ठरावाची अमलबजावणी घुसुर ग्रामस्थांनी केली आहे.

निता राठोड यांच्यासाठी ग्रामपंचायत सदस्य शशिकला मोरे यांनी 2022 मध्ये, आठ महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला. (ता. १७) या जागेवर मतदान होऊन निता राठोड यांना निवडून आणले. अनिता प्रकाश राठोड यांचा एकशे तीस मतांनी पराभव केला.

मोठ्या मनाने विद्यमान सरपंच कविता राहूल काळे यांनी राजीनामा देऊन निता राठोड यांच्यासाठी सरपंच पदाची खुर्ची खाली केली. दिलेला शब्द पाळून तो पाळणार्या घुसुर ग्रामस्थांची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

यासाठी वसंतराव काळे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपली सरपंच असलेली सून कविता राहुल काळे यांचा राजीनामा घेऊन नीता राठोड यांच्यासाठी जागा खाली करून दिली. दिलेला शब्द पाळून नवा अध्याय सुरू करण्यासाठी तालुक्यातील प्रतिष्ठीत डॉक्टर सिताराम जाधव, माजी नायब तहसीलदार शिवलाल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शशिकला मोटे, लता विष्णू जाधव, नशीबखां पठाण, योगेश चव्हाण, शिवाजी गायकवाड, संजय सुखदेव गुळवे, संदीप आसाराम नलावडे, ज्ञानेश्वर मोटे, वाल्मीक चव्हाण, संतु गुळवे, बशीर पठाण, शिवाजी गायकवाड, योगेश चव्हाण, किसन जाधव, विष्णू जाधव, नानासाहेब चव्हाण, अर्जुन चव्हाण, अजय राठोड, वसंत वाल्मीक चव्हाण, सागर खोटे, मनोज काळे, शुभम काळे, भाऊलाल राठोड, शिवाजी पवार, प्रकाश पवार, विलास चव्हाण, साईनाथ राठोड, अर्जुन जाधव, विजय चव्हाण, शाहरुख पठाण, संजय राठोड, म्युझिक पठाण आदींनी परिश्रम घेतले.

निवडणूक अधिकारी म्हणून मंडळाधिकारी सतीश भदाने यांनी काम बघितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com