

Delayed Voter Lists Cause Confusion in Kannada
sakal
कन्नड : उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरताना संबंधित उमेदवाराचा मतदान यादीतील अनुक्रमांक नमूद करणे आवश्यक असते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान दोन ते तीन दिवस अगोदर म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. परंतु, ११ नोव्हेंबरपर्यंत देखील ही यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे नामनिर्देशन अर्ज भरताना उमेदवारांचा गोंधळ उडत आहे.