

A 79-year-old woman died after a speeding tempo hit a motorcycle near Doodhad on the Karmad–Ladsawangi road. The driver fled the scene, while locals blamed the badly damaged road, where three people have lost their lives in the last two months.
Sakal
बाळासाहेब काळे
करमाड : करमाड–लाडसावंगी मार्गावरील दूधडजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ७९ वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला आहे. गुरुवारी (ता. ६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा अपघात झाला. धडकेनंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने टेम्पोचा क्रमांक मिळू शकला नाही. दरम्यान, या मार्गावरील खड्ड्यांमुळे गेल्या दोन महिन्यांत तिसरा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.छायाबाई पुंडलिक भिसे (वय ७९, रा. निमखेडा, ता. फुलंब्री) असे मृत महिलेचे नाव आहे. तर भरत दगडू सोळुंके (वय ५५, रा. भांबर्डा) हे जखमी झाले आहेत.