esakal | कासारवाडीच्या पपईचा गोडवा आग्रा - दिल्लीपर्यंत, आधुनिक शेतीतून साधली आर्थिक प्रगती
sakal

बोलून बातमी शोधा

2papaya_0

उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या मागे न लागता. शेतीतून केलेल्या प्रयोगाने येथील तरुण शेतकऱ्याने आर्थिक प्रगती केली आहे. त्यांनी केलेल्या पपईचा गोडवा थेट आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोहचला आहे.

कासारवाडीच्या पपईचा गोडवा आग्रा - दिल्लीपर्यंत, आधुनिक शेतीतून साधली आर्थिक प्रगती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिरसाळा (जि.बीड) :  उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या मागे न लागता. शेतीतून केलेल्या प्रयोगाने येथील तरुण शेतकऱ्याने आर्थिक प्रगती केली आहे. त्यांनी केलेल्या पपईचा गोडवा थेट आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोहचला आहे. पांरपारीक पिकांना वगळून युवक शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करून शेतीत बदल केले आहेत. कासारवाडी गावातील सुभाष पौळ या शेतकऱ्यांने इंग्रजी विषयात पदवी पूर्ण केली आहे. तरीही नोकरीच्या मागे न लागता त्यांनी "पपई'पिकाचे भरघोस उत्पादन घेतले आहे.

फेब्रुवारीच्या शेवटी चार एकर क्षेत्रात आठ बाय सहा फुटावर तीन हजार ६०० रोपाची लागवड केली. सुरुवातीला लॉकडाउनमुळे अडचणी आल्या. रोपे, ड्रीप, खते, फवारणी मजुरी असा एकूण दोन लाख रुपये खर्च झाला. त्यानंतर मात्र भरभरून पीक हाती आले. गेल्या दोन महिन्यापासून पंचवीस टन माल जागेवरूनच आग्रा, दिल्ली पर्यंत गेला. पपई विक्रीसाठी त्यांना बाजारात जाण्याचीही गरज पडली नाही. व्यापाऱ्यांनी जागेवरच पपईची खरेदी करुन हा माल दिल्ली, आग्रा आणि परिसरात नेला आहे. यातून त्यांना तब्बल अडीच लाखावर उत्पन्न झाले आहे.आणखी साठ-सत्तर टन माल तयार असून यातून सुमारे चार लाखाचे उत्पादन अपेक्षीत असल्याचे सुभाष पौळ यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar