नेमाडे संमेलनाध्यक्ष व्हावेत ही तर डॉ. कसबेंची इच्छा

सुशांत सांगवे
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

लातूर : एकमेकांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी 'ज्ञानपीठ'प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे संमेलनाध्यक्ष व्हावेत यासाठी ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी पुढाकार घेतला होता, अशी आश्चर्यकारक माहिती खुद्द डॉ. कसबे यांनीच सांगितली. साहित्य महामंडळाने या नावाचा विचार केला नसला तरी एका लेखकाच्या मनाचा मोठेपणा यानिमित्ताने समोर येत आहे.

एका कार्यक्रमासाठी डॉ. कसबे हे लातुरात आले होते. या पार्श्वभूमीवर 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. कसबे म्हणाले, नेमाडे हे संमेलनाध्यक्ष झाले असते तर लोकांनी त्यांना स्वीकारले असते, जरी ते संमेलनाला रिकामटेकड्यांचा उद्योग म्हणत असले तरी. पूर्वी निवडणुका होत्या. मते मागावी लागायची. हात जोडावे लागायचे. त्यामुळे त्यांची संमेलनावर नाराजी असावी. आता निवडणुकीची प्रक्रिया बदलली आहे. सन्मानाने अध्यक्ष होता येते. त्यामुळेच त्यांचे नाव आवर्जून पुढे आणले होते." 

मी स्वतः महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणे, हे नैतिकदृष्टया योग्य होणार नाही. पण सुधीर रसाळ, ना. धों. महानोर, म. सो. पाटील, यशवंत मनोहर, अर्जुन डांगळे अशी अनेक चांगली नावे संमेलनाध्यक्षपदासाठी आहेत. यांच्यापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. निवडणूक टाळून निवड प्रक्रिया आली आहे. हि नवी प्रक्रिया आपण जशी-जशी वापरू तसे-तसे काही गुण-दोषही पुढे येतील. त्यातील दोष दूर करून हि प्रक्रिया काळानुसार आपल्याला अधिक योग्य बनवायला हवी, असेही डॉ. कसबे यांनी सांगितले.

Web Title: Kasbe wish for the Nemade will be the Samelanadhyaksh