डोक्‍यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा - निलय मेहता

योगेश पायघन
सोमवार, 11 जून 2018

देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी तरुणाईच्या खांद्यावर आहे. त्यासाठी आपण दुसऱ्याकडुन काय शिकतो, परिवर्तन काय करतो त्यावर आपली प्रगती अवलंबून आहे. मनापासून कोणतेही काम केले तरच यशस्वी होता येते. वादाने विषय सुटत नाहीत. त्यासाठी डोक्‍यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवली तर आपली प्रगती निश्‍चित आहे, असा कानमंत्र निलया आय-कॅटस्‌चे संस्थापक निलय मेहता यांनी दिला.

औरंगाबाद - देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी तरुणाईच्या खांद्यावर आहे. त्यासाठी आपण दुसऱ्याकडुन काय शिकतो, परिवर्तन काय करतो त्यावर आपली प्रगती अवलंबून आहे. मनापासून कोणतेही काम केले तरच यशस्वी होता येते. वादाने विषय सुटत नाहीत. त्यासाठी डोक्‍यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवली तर आपली प्रगती निश्‍चित आहे, असा कानमंत्र निलया आय-कॅटस्‌चे संस्थापक निलय मेहता यांनी दिला.  युवकांना "यीन'च्या माध्यमातून जोडण्याचे व दिशा देण्याचे काम 'सकाळ माध्यम समुह' करीत आहे. त्यातून परिवर्तन करण्याकडे वाटचाल करण्याचा सल्ला मेहता यांनी युवकांना दिला. 

पुढे बोलतांना मेहता म्हणाले, की माणसाच्या बुद्धीची ताकत हीच त्याचा यशाचा मार्ग आहे. त्याने ठरवले ते तो करू शकतो. माणूस म्हणून जगण्यात सारथ्य ठेवा. विचारपुर्वक आयुष्य जगले तर ते खुप सुंदर आहे. यशस्वी व्हायचे असेल तर माणूस म्हणून जगण्यावरोबर देवत्व मिळवण्याजोगे काम करा. त्यासाठी आत्मा पेटून उठला पाहिजे. जात, रक्त, धर्माने माणूस घडत नाही. तो घडतो संस्कार, शिक्षण व विचाराने. उत्तम शिक्षण यश देते. जे आवडतं ते करण्यासाठी आपला जन्म नाही. परिस्थिती समजून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता विकसित करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: keep Ice on the head and sugar on the tounge says mehta