esakal | केज : अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

केज : अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केज : शेतात शेळ्या सांभाळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने जबरदस्तीने अत्याचार केला. पिडीत मुलीने तिला दिवस गेल्याचे सांगताच त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून दिल्याची माणुसकीला नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबधितावर गुरूवार (ता.०२) रोजी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी शेळ्या सांभाळण्यासाठी म्हासोबाचे शेत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतात जात होती. ती शेतात एकटीच असल्याचे पाहून तिच्या भावकीतील नात्याने चुलत भावाने तिला तू खुप चांगली दिसतेस, तु मला खुप आवडेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे! असे म्हणत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तो मागील मे महिन्यापासून पाच महिने तिच्यावर अत्याचार करत होता. यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची

हेही वाचा: अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याचा टेबलच काढला; निफाडमध्ये कारवाई

समजताच त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने पिडीतेस विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारचे पवित्र नात्याला काळीमा फासणारा दुसरा-तिसरा कोणी नसून अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ आहे. हा आपल्या सोबत घडलेला प्रकार अल्पवयीन मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगताच गुरूवारी त्यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी संबधितावर बाललैंगिक अत्याचार कायदा, बलात्कार करून खून करण्याचा प्रयत्न करणे व बाललैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top