Navratri : खंडेश्वरीच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

सोमवारपासून विविध कार्यक्रम यात्राही भरणार
Navratri
Navratri sakal

बीड : शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेश्वरी देवी येथील नवरात्रोत्सवास सोमवारपासून सुरुवात होत आहे. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून परिसराची स्वच्छताही करण्यात आली. मंदिर परिसरात नवरात्रात भव्य यात्राही भरते.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर या वर्षी प्रथमच खंडेश्वरी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव होणार असल्याने भाविकांमध्येही उत्सुकता आहे. ता. २६ सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर या कालावधीत मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मंदिरात घटस्थापना करून उत्सवास सुरुवात होईल. खंडेश्वरी मंदिरात बीडसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.

पहाटे चार वाजेपासून दर्शन रांग सुरू होते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोशणाई केली आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीही बसविण्यात आले आहेत. उत्सव काळात सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तही राहणार आहे. ता. पाच ऑक्टोबरला विजयादशमीनिमित्त पहाटे चार वाजता श्री खंडेश्वरी देवीची महापूजा होऊन सकाळी सात वाजेपासून दर्शन सुरू होणार आहे.

खंडेश्वरीच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

सायंकाळी सीमोल्लंघनानंतर साडेसात वाजता बीडवासीयांचे आकर्षण असलेल्या ४० फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन व आतषबाजीने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान, नवरात्रात रोज सकाळी साडेचार वाजता श्री खंडेश्वरी देवीची काकडा आरती, यानंतर साडेआठ वाजता आरती, दुपारी बारा वाजता आरती व नैवेद्य दाखविला जाईल. सायंकाळी साडेसात वाजता मंदिर परिसरात देवीची छबिना पालखी व सवाद्य मिरवणूक व रात्री साडेआठ वाजता महाआरती होईल. रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर बंद राहील.

भाविकांच्या सोयीसाठी पार्किंगची व्यवस्था

श्री खंडेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आकशवाणी टी पॉईंट, तेलगाव रोड येथून येणाऱ्या वाहनांसाठी महादेव मंदिराजवळील पाण्याच्या टाकी येथे तसेच एमआयडीसी भागातून येणाऱ्या वाहनांसाठी गोरे ऑईल मिलच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com