esakal | खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात; हिंगोली जिल्ह्यात ट्रॅक्टरने केली जातेय पेरणी
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रॅक्टरद्वारे पेरणी

खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात; हिंगोली जिल्ह्यात ट्रॅक्टरने केली जातेय पेरणी

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे मृगाचा दमदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने पेरण्याना सुरुवात केली आहे.

तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे भागात मृग नक्षत्र व रोहिणी नक्षत्राचा दमदार पाऊस झाला. या मंडळात आतापर्यंत ७२. ७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मागील चोवीस तासात १७.८ मिलीमीटर पाऊस झाला.

येथील अनेक शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे उन्हाळ्यातच केली होती. तसेच या शेतकऱ्यांनी खते, बियाणे व पेरणीचे साहित्य देखील खरेदी केले होते. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचा चांगल्या पावसाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हेही वाचा- मागील चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका- WHO

दोन दिवस झालेल्या पावसाने शुक्रवारी (ता. अकरा) उघाड दिल्याने डिग्रस कऱ्हाळे येथील अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवरील पेरणीयंत्राने सोयाबीन पेरणीची कामे सुरु केली आहेत. यामुळे ट्रॅक्टरवरील पेरणी यंत्र असलेल्या चालक व मालकाना देखील कामे मिळाली आहेत. एका बॅगच्या पेरणीसाठी सहाशे रुपये मजुरी घेतली जात आहे. सकाळपासून शेतकरी व ट्रॅक्टर चालक शेतशिवारात गेले आहेत. दरम्यान यावर्षी या भागात सोयाबीनचा पेरा अधिक होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या ट्रॅक्टरवरील पेरणी यंत्राला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

येथे क्लिक करा - हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे श्री संत नामदेव किर्तन महोत्सवास दोनशे दिवस पूर्ण

बैलजोडीवर पेरणीसाठी लागणारा कालावधी तसेच पेरणीसाठी मजूर याचा खर्च पाहता ट्रॅक्टरवरील पेरणी यंत्राला शेतकरी प्राधान्य देत आहेत. दरम्यान डिग्रस कऱ्हाळे येथे खरीपाच्या पेरण्याना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.