

Beed Bat Assault Case
Esakal
बीड जिल्ह्यातील शिरूर परिसरात एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला आता न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयाने या मारहाण प्रकरणात सतीश भोसलेसह तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुमारे १६ महिने चाललेल्या खटल्याच्या अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.