
भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा जामीन मंजूर करण्यात आलाय. शिरूर कासार इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी खोक्या भोसलेचा जामीन अर्ज मंजूर केला. सतीश भोसलेवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यानंतर त्याची रवानगी बीडच्या कारागृहात करण्यात आली होती.