Jalna News : जालन्यात मुलाने केला जन्मदात्याचा खून

पित्याचा खून केल्यानंतर बाथरूमची भिंत कोसळून वडिलांचा मृत्यू झाल्याचा बनाव संशयिताने केला होता.
jalna
jalnasakal

जालना : शहरातील गांधीनगर येथे कौटुंबिक वादातून मुलाने जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना सोमवारी (ता.१८) दुपारी घडली. शाहरूख इब्राहिम खान असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान पित्याचा खून केल्यानंतर बाथरूमची भिंत कोसळून वडिलांचा मृत्यू झाल्याचा बनाव संशयिताने केला होता.

शहरातील गांधीनगर येथे इब्राहिम खान आणि त्यांचा मुलगा शाहरूख खान या दोघांत कौटुंबिक वादातून बाचाबाची झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या शाहरूख खाने याने जन्मदात्यावर लाकडी दांड्याने डोक्यात वार केले. यात इब्राहिम खान यांचा मृत्यू झाला आहे. आपल्या हातून वडिलांचा खून झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाहरूख खान याने वडिलांच्या अंगावर बाथरूमची भिंत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव केला.

jalna
Jalna Crime : राणीउंचेगाव येथील शिवाजीनगरमध्ये घरफोडी; सोन्या,चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम 6 लाख 87 हजार लंपास

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा केल्यानंतर हा खून असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. चौकशीअंती मुलाने वडिलांचा खून केल्याचे समोर आल्यानंतर सदर बाजार पोलिसांनी संशयित आरोपी शाहरूख खान याला ताब्यात घेतले. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com