किरण सोनटक्के यांना परभणी विधानसभेची संधी मिळणार!

गणेश पांडे
सोमवार, 17 जून 2019

परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी सुरू झाली आहे. परभणी विधानसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस दावा करण्याच्या तयारीत असून या जागेसाठी ओबीसी प्रवर्गातील स्वच्छ चेहरा असलेल्या प्रा. किरण सोनटक्के यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या साठी 23 जून रोजी मुंबईत एक महत्वाची बैठक होऊ घेतली आहे.

परभणी विधानसभा मतदार संघाची जागा आघाडीत काँग्रेस पक्षाकडे आहे. परंतु गेल्या 25 वर्षा पासून काँग्रेसला या मतदार संघात यश मिळवता आले नाही. उलट लोकसभेत या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकर्यांमध्ये विधानसभेसाठी आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे परभणी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यावी असा आग्रह कार्यकर्ते व पदाधिकारी पक्ष श्रेठी कडे करत आहेत. यामुळेच पक्ष्यांच्या ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्षणी परभणी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्याकडे विधानसभा लढविण्याची इच्छा आहे का अशी विचारणा करण्यात आली आहे. सोनटक्के यांनी देखील या बाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

प्रा. किरण सोनटक्के यांनी जिल्ह्यात चांगले संघटन केले आहे. शिवाय स्वच्छ प्रतिमा असलेले किरण सोनटक्के यांचा शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामूळे किरण सोनटक्के यांचे नाव पक्षश्रेष्ठी कडून समोर येत आहे. येत्या 23 जून रोजी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत परभणीच्या जागेची मागणी करण्याचा निर्णय होऊ शकतो. या बैठकीला परभणी जिल्ह्यातील सर्व विभागाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महापालिका सदस्य व इतर उपस्थित राहणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kiran Sontakke got opportunity in assembly elections