Kunbi Certificates : कुणबी प्रमाणपत्रांबाबत फडणवीस सरकारच्या मंत्र्यांलाच संशय, खळबळजनक विधानाची होतेय चर्चा

Maratha Reservation : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरु आहे. दाखले मिळाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत. मराठा बांधवांनी आजचा दिवस दिवाळी सणासारखा असल्याची भावना व्यक्त केली आहे.
Cabinet Minister Naurhari Zirwal distributing Kunbi certificates to Maratha community members during an official event in Marathwada.

Cabinet Minister Naurhari Zirwal distributing Kunbi certificates to Maratha community members during an official event in Marathwada.

sakal
Updated on

Summary

फडणवीस सरकारकडून मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरु झाले आहे.

कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रमाणपत्रांची न्यायालयातली वैधता टिकेल की नाही असा संशय व्यक्त केला.

मराठा बांधव भावनिक होत आंदोलनाला यशस्वी मानत आहेत व मनोज जरांगे पाटील यांना श्रेय देत आहेत.

Naurhari Zirwal statement on kunbi certificates : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या लढ्यानंतर मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत फडणवीस सरकारकडून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले जात आहे. दरम्यान हिंगोलीचे पालकमंत्री राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. सरकारने दिलेले हे प्रमाणपत्र न्यायालयात टिकेल की नाही असा संशय झिरवळ यांनी व्यक्त केला आहे. नरहरी झिरवळ यांच्या या विधानाची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com