मजुरांनो सावधान, शेत जमिनीतून निघतोय कोब्रा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

जरंडी : अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेल्या सोयगाव शेती शिवारात शेतातील नळ्यामध्ये गुरुवारी कोब्रा नागाने मजुरांना दर्शन दिल्याने, मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान बदलत्या गारठ्याच्या वातावरणाने सोयगाव शिवारात विषारी सापांनी शेती शिवारे गाठल्याने मजुरांमध्ये दहशत पसरली असल्याने मजुरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून शेतीची मशागत करतांना खाली पाहण्याचा सबुरीचा सल्लाही शेती मालकांनी दिला आहे.

सोयगाव शेती शिवाराचा पूर्णपणे भाग अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी वसलेला आहे. दरम्यान अजिंठ्याच्या डोंगराच्या हिरवळीतून मोठे मोठे नाग शेतातील नळ्यांमध्ये वास्तव्य करून राहत असल्याने मजुरांसाठी धोक्याची घंटा झाली आहे. दरम्यान सोयगावच्या जंगलात विषारी सापांची परंपराच आहे. सापांची जमिनीवर येण्याच्या हंगामाला सुरुवात होते न होते तोच गुरुवारी एका शेतातील नळ्यांमध्ये निळ्याशार कोब्रा नागाने दर्शन दिल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांची बोबडी वळाली होती.

अजिंठा डोंगरातील सरपटनारे प्राण्यांसह विषारी सापांनी सोयगाव शिवार माहेरघर केल्याने मजुरांची मोठी पंचायत झाली आहे. सध्या शेती मशागतीचे दिवस आहे. त्यामुळे मजुरांची वाढती धांदल शेतातच असल्याने त्यातच कोब्रा नागांनी शिवारे काबीज केल्याने अडचणीत वाढ झाली आहे.दरम्यान शेती मालकांनी मजुरांनाच सावधानतेचा इशारा दिला असल्याने दहशतीखाली मजूरवर्ग शेतीचे निंदनी, खते घालणे आदि कामे करत आहे.काही शेती शिवारात मोबाईलवरून गाणे वाजवीत मजूर शेतीचे कामे करत आहे.

Web Title: The laborers are careful, the cobra is coming out of the field