esakal | मिळाले तर दोन घास खायचे, चालत राहायचे... 
sakal

बोलून बातमी शोधा

मंठा : लॉकडाउनमुळे महानगरातून गावाकडे जाताना क्षणभर विश्रांतीसाठी थांबलेले मजूर. 

रस्त्याने कोणी खायला दिले तर खायचे, नाहीतर पाणी पिऊन झाडाखाली थांबायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. मूळ गावी जाण्यास किती दिवस लागतील हे निश्चित नाही. अनेकांच्या पायांत पादत्राणेही नाहीत. 

मिळाले तर दोन घास खायचे, चालत राहायचे... 

sakal_logo
By
कृष्णा भावसार

मंठा (जि.जालना) - लॉकडाउनमुळे कामे ठप्प झाल्याने महानगरातील अनेक मजूर सहकुटुंब पायी गावाकडे निघालेले आहेत. डोक्यावर ओझे व कडेवर लहान मुलांना घेतलेल्या महिला दररोज पहाटे ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पायी चालताना दिसत आहेत.

रस्त्याने कोणी खायला दिले तर खायचे, नाहीतर पाणी पिऊन झाडाखाली थांबायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. मूळ गावी जाण्यास किती दिवस लागतील हे निश्चित नाही. अनेकांच्या पायांत पादत्राणेही नाहीत. 

हेही वाचा :  लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला मिळणार काम

कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यातल्या त्यात शहरात रोजमजुरी, कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचे खूप हाल होत आहेत. पहिले आठ-पंधरा दिवस कसेतरी गेले. नंतर मात्र हाल सुरू झाल्याने अनेक नागरिक मिळेल त्या वाहनाने जीव धोक्यात घालून सहकुटुंब आपली मूळ गावी परतले आहेत.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

परंतु नंतर सर्व वाहतूक बंद झाल्याने अनेकजण महानगरात अडकले. आता हे लोक पायीच गावाकडे निघाले आहेत. यातील बहुतेक जण आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू राज्यांत जाणारे आहेत. त्यांना हिंदी भाषादेखील समजत नाही. 

दानशूरही धावताहेत मदतीला 

कोरोनाच्या धास्तीने पायी जाणाऱ्यांचे हाल नागरिकांच्या लक्षात आल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांनी देवगाव फाटा ते विरेगाव यादरम्यान मिळणाऱ्या लोकांना पाणी, जेवण, चहा तसेच घरात जास्त असलेले कपडे, पादत्राणे मुद्दाम नेऊन देत आहेत. 

 

loading image