जनसंपर्कासाठी श्रमदानाचा फंडा !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

हिंगोली - यंदाचे वर्ष हे निवडणूकपूर्व वर्ष असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अचानक श्रमदानाची आवड निर्माण झाली आहे. नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गेल्या महिनाभराच्या काळातील टंचाई निवारणाच्या बातम्यांकडे बारकाईने पाहिल्यास ही बाब लक्षात येते. पाणी फाउंडेशनसारख्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात श्रमदान व साहित्य वाटप करण्याची जणू स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघांमधील कामांना आवर्जून हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. तसेच त्यांनी आता श्रमदान करण्याबरोबरच गावकऱ्यांना श्रमदान करताना लागणारे साहित्य वाटप करीत संपर्क चालविला आहे.
Web Title: labour donate planning for Public relations