स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायती समोरच अंत्यसंस्कार, १५ वर्षांपासून जागा मिळेना

गेल्या पंधरा वर्षापासून मागणी करूनही स्मशानभूमीला शासन जागा देईना.
Latur News
Latur Newsesakal

निलंगा (जि.लातूर) : गेल्या पंधरा वर्षापासून मागणी करूनही स्मशानभूमीला शासन जागा देत नसलेल्याने वैतागलेल्या हाणमंतवाडी (आंबुलगा-बु) येथील ग्रामस्थांनी वृद्धापकाळाने मृत्यू झालेल्या महिलेचा अंत्यविधी गावातील ग्रामपंचायत समोरच केल्याची दुर्दैवी वेळ आली आहे. हा प्रकार गुरूवारी (ता.२७) घडला. याबाबतची माहिती अशी की, हाणमंत (आंबुलगा-बु ) हे जवळपास दोन हजार लोकवस्तीचे असून अद्याप गावात स्मशानभूमी नाही. गेल्या वीस वर्षापासून हाणमंतवाडी (Latur) येथील गावकरी स्मशानभूमीसाठी जागा मागत आहेत. मात्र जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने मृतदेहाची अव्हेलना होत आहे. त्यामुळे गावात मृत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कुठे असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने संपूर्ण गावानेच हा निर्णय घेतला. सोजरबाई रामचंद्र निकम (वय७०) यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता.(Lack Of Crematorium Final Rituals On Elderly Woman In Nilanga Taluka Of Latur)

Latur News
जालन्यात थरार ! व्यावसायिकाला मारहाण करुन वाहन कालव्यात लोटून दिले

त्यांना शेती नसल्यामुळे मृत वृध्द महिलेचा अंत्यविधी गावातील चौकात ग्रामपंचायतसमोर केल्यावर तर प्रशासनाचे डोळे उघडतील का म्हणून अंत्यविधी केल्याचे सांगितले. येथे स्मशानभूमीला जागा नसल्यामुळे प्रत्येकजण शेतामध्येच अंत्यसंस्कार करतात. मात्र निकम यांना शेती (Farm) नसल्यामुळे अंत्यसंस्कार करायचा कोठे असा प्रश्न निर्माण झाला होता. येथे चार गुंठे जागा सार्वजनिक स्मशानभूमीसाठी गावाने खरेदी केली होती. मात्र संबंधित शेतमालकाने ती जागा गावातीलच एका व्यक्तीला विकली आहे. विकणारा व घेणारा हे दोघेही आता सदरील जमीन द्यायला तयार नाहीत. (Nilanga)

Latur News
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचा औरंगाबादेत रात्री फेरफटका,विकासकामांची केली पाहणी

त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थाचे हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. शासकीय स्तरावर पाठपुरावा होत नसल्याने या प्रकरणाचा निकाल लागत नाही, असा अरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या पंधरा वर्षापासून गावाला स्मशानभूमी नाही. ग्रामपंचायतीने अनेक वेळा पाठपुरावा करूनही जागा मिळत नाही. अंत्यविधी करण्यासाठी शासन जागा देत नाही. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून जागा उपलब्ध करून द्यावा. अन्यथा सर्व ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत असे ग्रामस्थ दर्मराज लखने, विनोद बिराजदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com