

Ladki Bahin Yojana
sakal
हिंगोली : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली. महिलांना मोठ्या संख्येने वेळेत ई-केवायसी करता यावी, म्हणून सरकारने मुदतवाढ देत ती ३१ डिसेंबर केली, तरी प्रत्यक्षात लाभार्थींना अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे.