घाटीच्या दारातच महिलेची उपचारासाठी तडफड

शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

सुरक्षारक्षकांचा उपचारासाठी नेण्यास नकार  

औरंगाबाद - घरच्या मंडळींनी आणून सोडलेल्या रुग्णाची उपचारासाठीची धडपड जीवनदान देण्याचे ठिकाण असलेल्या घाटी रुग्णालयात पाहावयास मिळते. अशीच एक महिला उपचाराअभावी अगदी दारातच उपचारासाठी तडफडत असल्याची घटना गुरुवारी (ता.११) समोर आली. ही बाब सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आणून दिली असता, त्यांनी हे आमचे काम नव्हे, अशा शब्दांत महिलेस उचलण्यास नकार दिला.

मराठवाड्यासह खान्देश परिसरातील रुग्णांसाठी सर्वांत मोठे उपचाराचे ठिकाण म्हणून येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचेच नाव घ्यावे लागते. काही वर्षांपासून येथे तपासणी तसेच भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या मर्यादेपेक्षा वाढत आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एक वृद्ध महिला घाटी पोलिस चौकीसमोरील पाण्याच्या टाकीजवळ तडफडत असल्याचे समोर आले. ही बाब अभ्यागत समितीचे सदस्य नारायण कानकाटे यांना समजली. त्यांनी महिलेला उपचारार्थ अपघात विभागात दाखल करण्याची सुरक्षारक्षकास विनंती केली. मात्र, त्याने नकार दिल्याने त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांना प्रकार कथन केला. त्यानंतर संबंधित सुरक्षारक्षकांस बोलावून महिलेस उपचारार्थ घेऊन जा, अशा सूचना करण्यात आल्या. मात्र, त्याने नियमावर बोट ठेवत आम्ही जिवंत व्यक्‍तींना हात लावू शकत नाहीत, असे उत्तर दिल्याने कानकाटे आणि सुरक्षारक्षकात जोरदार शाब्दिक खडाजंगीही झाली. यानंतरही जवळपास एक तास सुरक्षारक्षक लांबून बघून गेले. सायंकाळी अपघात विभागातील कर्मचाऱ्यांनी महिलेला दाखल करून घेत उपचार सुरू केले. 

Web Title: Lady

टॅग्स