डेंग्यूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू 

योगेश पायघन 
बुधवार, 25 जुलै 2018

औरंगाबाद : पतीच्या नोकरीनिमित्त पुण्यामध्ये राहणाऱ्या मोनाली प्रविण हजारे (वय 30) यांचा औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्या आजारी असल्याने त्या त्यांच्या माहेरी बुलडाणा येथे गेल्या होत्या. तपासणीत डेग्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औरंगाबाद सासर असलेल्या मोनाली यांचे बुधवारी (ता.25) सकाळी निधन झाले. 

औरंगाबाद येथील सरस्वती भुवन कॉलनीतील प्रविण हजारे हे पुणे येथे नोकरीनिमित्त राहतात. त्यांची पत्नी मोनाली हजारे यांची प्रकृती खराब झाल्याने त्या बुलडाणा येथे माहेरी गेल्या होत्या. तिथे तपासण्याअंती त्यांना डेंग्युची लागण झाल्याचे स्पष्ठ झाले. बुलडाण्यात उपचार सुरु होते. मात्र तब्बेत अधिक बिघडल्याने मोनाली यांना मंगळवारी (ता. 24) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास हेडगेवार रुग्णालयात हलवण्यात आले. दाखल केले त्यावेळी त्या अत्यंत अत्यवस्थ होत्या. त्यांचे अवयव काम करत नव्हते. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारात मोनाली यांचा मृत्यु झाला असे हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. अनंत पंढरे व डॉ. विकास रत्नपारखे म्हणाले. डेंग्यु प्युअर मुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे मृत्युचे कारण डॉक्‍टरांनी नोंदवले आहे. 

तर या मृत्यु झालेल्या महिला शहरात राहत नव्हत्या. नेमका मृत्यु कशामुळे झाला याची माहीती घेत आहोत. रुग्णालयाने अद्याप कळवलेले नाही. डेग्युमुळे मृत्यु कन्फर्म नसला तरी एस. बी. कॉलनी परिसरात प्रतिबंधात्मक कारवाईच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असे महापालीकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर म्हणाल्या. नागरीकांनी पाणी साचुन डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांच्या पश्‍चात पती सासु सासरे दीर असा मोठा परीवार आहे. गुलमंडी येथील श्रीराम स्टोअर्सचे श्री. हजारे यांच्या त्या मोठ्या सुन होत. मरणोत्तर मोनाली यांचे नेत्रदान करण्यात आले.

Web Title: a lady died due to dengue in aurangabad