लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ललितकुमार पोलिस ठाण्यात रुजू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

माजलगाव (जि. बीड) - लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ललिलाचा "ललित' झालेला पोलिस शिपाई ललितकुमार साळवे येथील शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी कर्तव्यावर रुजू झाला. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याने ललितला पोलिस दलात रुजू होता येईल का, याकडे लक्ष लागले होते.

राजेगाव (ता. माजलगाव) येथील ललिता साळवे ही 2010 मध्ये बीड जिल्हा पोलिस दलात महिला पोलिस शिपाई म्हणून रुजू झाली होती. तीन वर्षांपासून माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तिची नेमणूक होती; मात्र शारीरिक बदलांमुळे तिने लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी पोलिस अधीक्षकांकडे मागितली. दरम्यान, ही पहिलीच घटना असल्याने तिचा विनंती अर्ज वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. या प्रकारात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घालत ललिताला लिंग बदलाची परवानगी दिली; मात्र पोलिस दलात भरती होताना ती महिला शिपाई म्हणून भरती झाली. आता लिंगबदलानंतर तिच्या शरीराचे मोजमाप पुरुष म्हणून ग्राह्य धरायचे की स्त्री म्हणून, असा पेच निर्माण झाला होता. अखेर "विशेष बाब' म्हणून हा पेचदेखील सुटला.

दरम्यान, ललितावर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर "ललिता'चा "ललित' झाल्यावर गावी परतल्यानंतर तिचे वाजत-गाजत मिरवणूक काढून स्वागतही करण्यात आले. ललित आज शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रुजू झाला. या वेळी पोलिस निरीक्षक राजीव तळेकर उपस्थित होते.

Web Title: lalitkumar salave police station