ऑरिकमधील भूखंडवाटप प्रक्रियेसंदर्भात उद्या कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

औरंगाबाद - 'औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी'मधील (ऑरिक) 49 औद्योगिक भूखंड "औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाऊनशिप लि.'ने (एआयटीएल) विक्रीसाठी खुले केले आहेत. भूखंड वाटप प्रक्रियेबाबत उद्योजकांना माहिती व्हावी याकरिता बुधवारी (ता. सात) औरंगाबादेत कार्यशाळा होईल.

औरंगाबाद - 'औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी'मधील (ऑरिक) 49 औद्योगिक भूखंड "औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाऊनशिप लि.'ने (एआयटीएल) विक्रीसाठी खुले केले आहेत. भूखंड वाटप प्रक्रियेबाबत उद्योजकांना माहिती व्हावी याकरिता बुधवारी (ता. सात) औरंगाबादेत कार्यशाळा होईल.

एआयटीएलतर्फे पहिल्या टप्प्यातील भूखंड वाटपाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. भूखंडाचा दर 3,200 रुपये प्रति चौरस मीटर असा ठरविण्यात आला आहे. आतापर्यंत हजारावर उद्योजकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसुध्दा केले आहे. 27 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येतील. ऑनलाईन प्रक्रियेबाबतीत उद्योजक व इच्छुकांना माहिती व्हावी याकरिता एआयटीएलने बुधवारी एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात सकाळी 11 ते दुपारी एकदरम्यान कार्यशाळा होईल. यात ऑरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील माहिती देतील, अशी माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी कळविली.

डीएमआयसीअंतर्गत औरंगाबादनजीक उभारण्यात येणाऱ्या "ऑरिक' या पहिल्या औद्योगिक स्मार्ट सिटीतील भूखंड 28 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. "ऑरिक'च्या www.auric.city या अधिकृत वेबसाईटवर त्यासाठी नोंदणी करावी लागेल. या वेबसाईटवर जाऊन भूखंड क्रमांकानुसार अर्ज करावा लागेल.

असे आहेत भूखंडाचे आकार
600 ते 700 चौरस मीटर - 76
700 ते एक हजार चौरस मीटर - 04
एक हजार ते दोन हजार चौरस मीटर - 10
दोन हजार ते चार हजार चौरस मीटर - 19
चार हजार ते आठ हजार चौरस मीटर - 06
दोन एकर ते तीन एकर - 01
तीन एकर - 03

Web Title: land distribution process workshop