
अहमदपुरात जवान अनिल गुट्टे यांना भावपूर्ण निरोप,अनेकांनी वाहिली श्रद्धांजली
अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील गुट्टेवाडी येथील जवान अनिल जनार्दन गुट्टे यांच्या पार्थिवावर शासकीय इंतमामात बुधवारी (ता.२३) अंतिम संस्कार करण्यात आले. सैन्य दलात (Indian Army) बावीस वर्षांपूर्वी हवालदार पदावर रुजू झालेल्या अनिल गुट्टे यांनी आजपर्यंत जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, आसाम, भारत - चीन सीमा अशा विविध ठिकाणी देश सेवेचे कर्तव्य पार पाडले.चार महिन्यांपूर्वी त्यांची कोलकता येथे बदली झाली होती. मागील आठवड्यात झालेल्या ह्रदयविकारात त्यांच्या मेंदूवर आघात झाला व त्यातच त्यांचा सोमवारी (ता.२१) रात्री मृत्यू झाला होता. कोलकता ते हैदराबाद हवाईमार्ग, तर हैदराबाद ते मूळगाव गुट्टेवाडी या ठिकाणी बसने जवानाचे पार्थिव आणण्यात आले व बुधवारी दुपारी दोन वाजता गुट्टेवाडी येथील शेतात जवान अनिल गुट्टे यांच्या पार्थिवास प्रशासनाच्या वतीने तीन तोफांची सलामी देऊन मानवंदना दिली गेली. (Last Rituals On Indian Jawam Anil Gutte In Ahmedpur in Latur District)
हेही वाचा: काँग्रेसच्या काळात देश सुरक्षित होता, मेहबूबा मुफ्ती यांची मोदी सरकारवर टीका
पाच वर्षीय मुलगा सौरभ गुट्टे यांनी मुख आग्नी दिली. या वेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, सरपंच सुधीर गुट्टे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अहमदपूरहून (Ahmedpur) गुट्टेवाडीकडे पार्थिव घेऊन जाताना रस्त्यावरील लांजी, ढाळेगाव ,पार, अंधोरी या गावातील नागरिकांनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. (Latur)
हेही वाचा: 'मोदी आणि शहा हे केवळ लक्षणे, मूळ आजार तर नागपूरमध्ये आहे'
तालुक्यातील भुमीपूत्र अनिल गुट्टे यांचा पार्थिव जवळपास सकाळी अकरा वाजता अहमदपूर येथे पोहोचल्यावर शहरातील शिवाजी चौक येथे मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या वेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, शिवाजीराव देशमुख, पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड, माजी उपसभापती बालाजी गुट्टे यांची उपस्थिती होती.
Web Title: Last Rituals On Indian Jawam Anil Gutte In Ahmedpur In Latur District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..