काँग्रेसच्या काळात देश सुरक्षित होता, मेहबूबा मुफ्ती यांची मोदी सरकारवर टीका

...मग तिरंगा सोडून भगवा झेंडा लावावा का?
Narendra Modi And Mehbooba Mufti
Narendra Modi And Mehbooba Muftiesakal

श्रीनगर : चुका सर्वांकडून होतात. मग याचा अर्थ सर्व लष्कर चुकीचे आहे असे होत नाही. अरे आम्ही खूप वाईट दिवस पाहिले आहे. पण आम्हाला वाटते, की रक्तपात बंद व्हावा. आम्ही आनंदाने, आरामाने राहावे, असे वाटते. मात्र त्यांना हे नको आहे. त्यांना हवे की आमचे भांडण पाकिस्तानबरोबर चालू राहावे. हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम करत राहावे, जीनी-जीना करत राहावे, असा आरोप पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी भाजपवर केला. त्या जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) सांबा येथे आज मंगळवारी (ता.२२) बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आता तर जीना यांना सोडून ते बाबरची आठवण काढत आहेत. आता तर औरंगजेबचीही आठवण काढत आहेत. अरे औरंगजेब ५०० ते ६०० वर्षांपूर्वी होऊन गेला. बाबर सहाशे ते सातशे वर्षांपूर्वी होऊन गेला आहे. आमचा त्यांच्याबरोबर काय संबंध? (Mehbooba Mufti Attack On BJP, Said Congress Kept India Safe)

Narendra Modi And Mehbooba Mufti
चिनी गुंतवणुकीच्या जाळ्यात श्रीलंका ? पुन्हा ड्रॅगनकडेच मदतीची याचना

तुम्ही त्यांची आठवण का काढता? तुमच्याकडे लोकांना देण्यासाठी रस्ते नाहीत का? पाणी नाही का ? वीज नाही का? आम्ही पूर्ण देशाला वीज पुरवतो. मात्र आमच्या शेतात पाणी देण्यासाठी वीज नसते. आमच्या कॅनाॅलमध्ये पाणी नसते, या शब्दांमध्ये मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. आमच्या मुलामुलींची स्थिती वाईट आहे. ती संकटात आहेत. आमच्या आई-बहिणी वाट पाहातात की आमची मुले पुन्हा सुरक्षित घरी येतील की नाही. आता निवडणुका नाहीत. मी तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी आलेली नाही. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले आहे, की काँग्रेस पक्षाने (Congress Party) पन्नास वर्षे भले चुकीचे कामे केले असतील. मी म्हणत नाही की त्यांनी सर्व बरोबर केले. पण त्यांनी या देशाला सुरक्षित ठेवले.

Narendra Modi And Mehbooba Mufti
'भाजपला रोखण्यास महाविकास आघाडी खंबीर, त्यासाठी एमआयएमची गरज नाही'

हिंदू, मुसलमानांना सांभाळून ठेवले. देशाला तोडले नाही. हे लोक देश तोडू इच्छित आहेत. जिना यांनी एक पाकिस्तान बनवला, तर हे अनेक पाकिस्तान बनवू इच्छित आहेत, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर (Modi Government) केला. हिंदू-मुसलमान, दलित-राजपूत, दलित-ब्राह्मण असा भेद त्यांना करायचा आहे. आज हे मुस्लिम मुलींना म्हणतात, की डोक्यावर दुपट्टा ठेवू नका. उद्या ते म्हणतील तुम्हाला फक्त भगवा रंगाचा दुपट्टा घालावा लागेल, तर तुम्ही घालणार का? आज हे म्हणतात, की तिरंगा सोडा आणि भगवा झेंडा लावा. मग तिरंगा सोडून भगवा झेंडा लावावा का?, असा सवाल मुफ्ती यांनी भाजपला (BJP) केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com