'मोदी आणि शहा हे केवळ लक्षणे, मूळ आजार तर नागपूरमध्ये आहे' |Narendra Modi And Amit Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi and Amit Shah

'मोदी आणि शहा हे केवळ लक्षणे, मूळ आजार तर नागपूरमध्ये आहे'

औरंगाबाद : मोदी आणि शहा हे केवळ लक्षणे आहेत. मूळ आजार तर नागपूरमध्ये आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली. देशात अर्धसत्येचे शैतान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याला सत्यानेच भस्मसात करू शकतो. त्यामुळे खरा इतिहास वाचून तो जनतेसमोर आणण्याची गरज आहे, असे टकले (Niranjan Takle) म्हणाले. औरंगाबाद येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने गांधी भवनात रविवारी (ता.२०) आयोजित ‘गांधी : काल आज उद्या’ या विषयावरील व्याख्यानात टकले बोलत होते. कोणतेही वाचन नसलेले आणि विचार नसलेले लोक मालवाहतूक केल्याप्रमाणे संदेश फॉरवर्ड करतात असे सांगत यावेळी टकले यांनी मोदी, शहा आणि संघावर सडकून टीका केली. (Niranjan Takle Attack On Narendra Modi And Amit Shah)

हेही वाचा: नितीश कुमारांवर भाजपचे केंद्रीय मंत्री संतापले; म्हणाले, हिंदूंनी जावे कुठे ?

मोदी आणि शहा ही देशातील बुलडोझर आहेत. त्यांनी आतापर्यंत देशात काही उभारलेले नाही, परंतु भारताला उद्ध्वस्त करायचे काम ते करत आहेत. तर पुण्यतिथी दिनी संघ (RSS) गांधींना वंदन करते परंतु इतर दिवस ते वंदन का करित नाहीत. कारण संघाला गांधींच्या (Mahatma Gandhi) मृत्यूवर जास्त प्रेम असल्याचे निरंजन टकले म्हणाले. देशातील सर्व मशिदी या वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात व वक्फ बोर्ड हे भारत सरकारच्या अधिपत्याखाली चालतात.

हेही वाचा: Pakistan| इम्रान खान यांच्या प्रयत्नांना अपयश, द्यावा लागणार राजीनामा ?

मोदी आणि शहा ही देशातील बुलडोझर आहेत. त्यांनी आतापर्यंत देशात काही उभारलेले नाही, परंतु भारताला उद्ध्वस्त करायचे काम ते करत आहेत. तर पुण्यतिथी दिनी संघ गांधींना वंदन करते परंतु इतर दिवस ते वंदन का करित नाहीत. कारण संघाला गांधींच्या मृत्यूवर जास्त प्रेम असल्याचे निरंजन टकले म्हणाले. देशातील सर्व मशिदी या वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात व वक्फ बोर्ड हे भारत सरकारच्या अधिपत्याखाली चालतात.