
अनेक वर्षे प्रकाशक राज्य सरकारकडे प्रत्येक तालुक्यात किंवा जिल्हा परिषदेच्या कार्यालयाजवळ पुस्तक विक्री केंद्र सुरू करावे अशी मागणी करत आहेत.
संत गोरोबा काका साहित्य नगरी
उस्मानाबाद - नवनवीन पुस्तके ग्रामीण वाचकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे; तरच वाचनसंस्कृती वृद्धिंगत होईल. त्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री उभारावे, अशी मागणी 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त नव्या राज्य सरकारकडे प्रकाशकांनी केली.
अनेक वर्षे प्रकाशक राज्य सरकारकडे प्रत्येक तालुक्यात किंवा जिल्हा परिषदेच्या कार्यालयाजवळ पुस्तक विक्री केंद्र सुरू करावे अशी मागणी करत आहेत. फडणवीस सरकारने प्रत्येक तालुका किंवा जिल्हा परिषद येथे पुस्तक विक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असा जीआरही काढला. या जीआरची अजून अंमलबजावणी झाली नाही. तो जीआर केवळ कागदावरच राहिला.
आज राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी केवळ 19 जिल्ह्यांत पुस्तकांची दुकाने आहेत. उर्वरित जिल्ह्यात पुस्तक मिळत नाही. त्यामुळे पुस्तक विक्री केंद्र प्रत्येक तालुक्यात त्वरित सुरू करावे, अशी प्रकाशकांची मागणी आहे.
मागच्या राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात पुस्तक विक्री केंद्रासाठी जागा दिली जाईल असा जीआर काढला. त्याची अंमलबजावणी त्वरित करावी. जसे गावात वेंडर आले त्यामुळे गावोगावी वर्तमानपत्र पोचले. तसेच तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू केले तर प्रकाशक प्रकाशित करत असलेली पुस्तके या केंद्रावर उपलब्ध होतील ती गावोगावी वाचकांपर्यंत
पोचतील.
- सुदेश हिंगलासपूरकर, विश्वस्त, ग्रंथालीजिल्हा परिषदेच्या कार्यालयात पुस्तक विक्री केंद्र किंवा दालन असावे, अशी गेली 15 वर्षे राज्य सरकारकडे मागणी करत आहोत. जीआरही आला. पण, अजूनही अंमलबजावणी झाली नाही. आता 93 वे साहित्य संमेलन आहे. मागच्या सरकारने आमच्या मागणीची दखल घेतली नाही. आता नव्या सरकारने याची दखल घेतल्यास वाचनसंस्कृती रुजवण्यास आणखी हातभार लागेल.
- आशिष पाटकर, मनोविकास प्रकाशन
संबंधित बातम्या -
संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे चांदीचे पदकाने प्रदान करणार
Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके