संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे चांदीचे पदकाने प्रदान करणार

सुशांत सांगवे
Friday, 10 January 2020

पुण्यातील पु. ना. गाडगीळ (नळ स्टॉप) अभय गाडगीळ यांनी 'मसाप'चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना संमेलनाध्यक्षांसाठी दरवर्षी विनामूल्य पदक बनवून देऊ असे सांगितले. साहित्य महामंडळानेही याला मान्यता दिली.

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष हे नियोजित अध्यक्षाला सूत्रे प्रदान करतात. पण, ही अध्यक्षपदाची सूत्रे गेली अनेक वर्षे अदृश्य स्वरूपात होती. तर मागील एक-दोन संमेलनात ती पुष्पगुच्छ देऊन प्रदान केली जात होती. यंदापासून मात्र, चांदीचे पदक देऊन ही सूत्रे प्रदान केली जाणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात मावळत्या अध्यक्षाने नव्या अध्यक्षांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करायची असतात. पण, प्रत्यक्षात व्यासपीठावर काहीही घडत नव्हते. त्यामुळे सूत्रे प्रदान करायचे म्हणजे नेमके काय करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. म्हणून मावळत्या अध्यक्षाने नव्या अध्यक्षाला पुष्पगुच्छ देऊन सूत्रे देण्याची पद्धत अलीकडे सुरू झाली. त्यात आता भर पडली आहे, चांदीच्या पदकाची.

पुण्यातील पु. ना. गाडगीळ (नळ स्टॉप) अभय गाडगीळ यांनी 'मसाप'चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना संमेलनाध्यक्षांसाठी दरवर्षी विनामूल्य पदक बनवून देऊ असे सांगितले. साहित्य महामंडळानेही याला मान्यता दिली. या पदकावर संमेलन स्थळ, संमेलन वर्षे, अध्यक्ष, संमेलनाचे बोधचिन्ह याचा उल्लेख आहे. असे पदक प्रथमच अध्यक्षाच्या गळ्यात घालून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मिलिंद जोशी यांच्या प्रयत्नांमुळे हा क्षण उदघाटन सोहळ्यात अनुभवता येणार आहे.

हेही वाचा-

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News