लातुरात शोरूम फोडून २५ लाखांची चोरी

एलजी कंपनीच्या शोरूमसमोर टेम्पो लावून साहित्य लांबवले
 theft
theftSakal

लातूर : शहरातील औसा रोड भागातील एलजी कंपनीचे शोरूममध्ये चोरांनी शनिवारी (ता. २७) पहाटे हात साफ केला. चोरांनी शोरूमचे शटर उचकटून त्यातील एलजी कंपनीच्या विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून नेल्या. शोरूम दुकानाला टेम्पो लावून चोरट्यांनी त्यातील रोख साठ हजारासह पंचवीस लाख रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. मात्र, त्यांना शोरूमचे रोजचे काम सुरू असल्याचे वाटले.

पोलिसांनी सांगितले, की श्रीनिवास तोंदूलवार यांचे औसा रोडवर शांताई डिस्ट्रिब्युटर्स नावाचे एलजी कंपनीच्या विविध वस्तूंचे शोरूम आहे. चार वर्षांपासून हे शोरूम सुरू आहे. शनिवारी पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश केला व शोरूमसमोर टेम्पो लावत त्यात साहित्य घालून नेले. पहाटेच्या वेळी चोरटे ही चोरी करत असताना तेथून काही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी चालत गेले. काही पोलिसही तेथून गेल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र, सर्वांना कोणी तरी चोरी करत असल्याचे वाटले नाही.

शोरूममधून वस्तूंची ने-आण सुरू असावी, असेच सर्वांना वाटले. शोरूमचे मालक पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. शोरूमचे मालक श्री. तोंदुलवार हे शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी साडेसात वाजता शोरूम बंद करून घरी गेले. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता शोरूममध्ये पेपर टाकणाऱ्या मुलाने मालकाल कॉल करून सांगितले. मालक शोरूममध्ये आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून अज्ञात चोरांनी शोरूममधील रोख साठ हजार रुपये व एलजी कंपनीच्या एलईडी टीव्ही, कूलर, फ्रीज, ओव्हन, होम थिएटर, स्पीकर आदी ५० ते साठ प्रकारचे उत्पादनासह एकूण २५ लाख ४५ हजार २१० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड तपास करीत आहेत. दुकानांत सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेल्याने फुटेज हाती लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com