esakal | Latur : औशात भरधाव टिप्परने बालिकेला चिरडले
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Latur : औशात भरधाव टिप्परने बालिकेला चिरडले

sakal_logo
By
जलील पठाण

औसा (जि.लातूर) : लातूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग (latur tulajapur national highway) क्रमांक ३६१ वर निलंगा मोड येथे रस्ता ओलांडणाऱ्या दोन मुली आणि आजोबा यांना एका भरधाव टिप्परने जोराची धडक दिली यात एक पाच वर्षाच्या मुलीचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला आहे तर आजोबा गंभीर जखमी झाले. यात एक मुलगी सुदैवाने थोडक्यात बचावली. ही घटना गुरुवारी (ता.९) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

उस्मानाबादहून निलंग्याला जाण्यासाठी कुंडलिक पालमपल्ले रा. आनंद नगर निलंगा हे आपल्या नाती गंगाश्री व राजश्री यांच्यासह गुरुवारी (ता.९) दुपारी येथील निलंगा चौकात उतरून रस्ता ओलांडत होते. याच दरम्यान लामजना पाटीवरून लातुरकडे भरधाव वेगात निघालेल्या टिप्परने (एम. एच.२४-एफ-९८२६) समोरून येणाऱ्या कारला चुकविताना या तिघांना जोराची धडक दिली.

हेही वाचा: केंद्राच्या सुचनेवरुन राणे कुटुंबियांविरोधात कारवाई; गृहमंत्र्यांचा खुलासा

यामध्ये राजश्री संतोष पालमपल्ले वय (पाच) वर्षे ही चाकाखाली सापडून चिरडली गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे आजोबा कुंडलिक पालमपल्ले हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या सोबत असणारी दुसरी नात गंगाश्री मात्र यात थोडक्यात बचावली. औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून टिप्पर चालक पोलीस ठाण्यात स्वतः होऊन हजर झाला आहे. घटनास्थळी बिट अंमलदार आर. चव्हाण यांनी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी औसा पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

loading image
go to top