esakal | सुट्टीला गावाकडे येताना जवानाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

soldier

तालुक्यातील कोपरा येथील सैन्य दलाचे कर्मचारी बलभीम रंगनाथ कांबळे यांच्यावर दिल्ली येथे मंगळवारी अंतिम संस्कार करण्यात आले

सुट्टीला गावाकडे येताना जवानाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

sakal_logo
By
रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (जि.लातूर): सन 2000 मधे बलभीम कांबळे सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. कांबळेंनी आजपर्यंत 18 वर्षे देशाच्या विविध भागांमध्ये देशसेवा केली होती. मागील दोन वर्षांपासून ते राजस्थान येथील गंगासागर येथे कार्यरत होते.

सुट्टी घेऊन गावाकडे येत असताना 9 डिसेंबरला दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवर ह्रदय विकाराच्या झटका आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कांबळेंचा मृतदेह गावाकडे येईल अशी अपेक्षा असतानाच सैन्य दलाच्या प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांना अंतविधीसाठी दिल्ली येथे बोलावल्याने

RBI चा राज्यातील आणखी एका बँकेला दणका! परवाना रद्द केल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ

जवान बलभीम कांबळे यांची पत्नी अनुजा कांबळे, भाऊ राहुल ढवळे, सारीपुञ ढवळे, मेहुणे सत्यशील कांबळे दिल्लीला गेले असून मयतावर मंगळवारी (ता.12) संध्याकाळी पाच वाजता अंतीम संस्कार करण्यात आले आहेत. बलभीम कांबळे यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

ह्रदय विकाराच्या झटका आल्याने कांबळेंना दिल्ली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृतदेह नातेवाइकांना न देण्याचे कारण काय? कोरोना संसर्ग  झाला का? झाला असला तर सुट्टी घेताना कोरोना चाचणी झाली नाही का? संसर्ग कोठे व कधी झाला अशी बरीच प्रश्न अनुत्तरीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

(edited by- pramod sarawale)


 

loading image