esakal | RBI चा राज्यातील आणखी एका बँकेला दणका! परवाना रद्द केल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

rbi news

रिझर्व्ह बँकेने यापुर्वी मुंबईतील सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँक, कोल्हापूरमधील सुभद्रा लोकल एरिया बँक, जालन्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, साताऱ्यातील कराड जनता बँकांचे लायसन्स रद्द केले होते.

RBI चा राज्यातील आणखी एका बँकेला दणका! परवाना रद्द केल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

उस्मानाबाद: मागील काही दिवसांपासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने राज्यातील असमर्थ ठरलेल्या बँकावर मोठी कारवाई केली आहे. आता महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून (RBI) रद्द करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

यापुर्वी मागील 2-3 महिन्यांपासून राज्यातील सहकारी बँकावर आरबीआय कारवाई करत आहे. आता उस्मानाबादमधील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. इथून पुढे या बँकेला व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

रिझर्व्ह बँकेने वसंतदादा सहकारी बँकेवर कारवाईबाबत एक पत्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये बँकेवर अनेक आरोप ठेवले आहे. बँक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात असमर्थ असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 
  
बँकेची लायसन्स रद्द झाल्याने लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ठेवीदारांचे पैसे आता परत देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे ठेवीदारांची 5 लाखांपर्यंतची रक्कम बँकेत सुरक्षित आहे. 

त्यामुळे आता बँकेतून 5 लाखांपर्यंतच पैसे मिळणार आहे. तसेच बँकेतील 99 टक्के खातेदारांचे पैसे परत देण्यात येणार आहेत. याबद्दलचे आदेश रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्राच्या कमिशनर फॉर कॉर्पोरेशन आणि रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला दिले आहेत. यामुळे, आता वसंतदादा नागरी बँकेचे कामकाज बंद केले जाणार आहे. तसेच बँक लवकर दिवाळखोरीतही काढली जाणार आहे.

शेतकरी कुटुंबांनी केली काळ्याआईची पूजा; बैलगाडीतून प्रवास

रिझर्व्ह बँकेने यापुर्वी मुंबईतील सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँक, कोल्हापूरमधील सुभद्रा लोकल एरिया बँक, जालन्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, साताऱ्यातील कराड जनता बँकांचे लायसन्स रद्द केले होते. आता उस्मानाबादमधील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचीही लायसन्स रद्द केली आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image