esakal | Latur: दुधाला प्रतिलिटर ४२ रुपये भाव
sakal

बोलून बातमी शोधा

milk

चाकूर : दुधाला प्रतिलिटर ४२ रुपये भाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणा : उजळंब (ता. चाकूर) येथे लातूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित लोणी (ता. उदगीर) अंतर्गत नागनाथ स्वामी व जय तुळजाभवानी महिला सहकारी दूध संस्था यांची गुरुवारी (ता. ३०) दूध उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संघाने सुचविलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली. शिवाय इतर खासगी दूध संघापेक्षा जिल्हा दूधसंघ म्हशीच्या ६.०/९.० ला ४२ रुपये भाव देण्याचे जाहीर केले.

पुढील काळात बँकांच्या सहकार्यातून दूध उत्पादकांना दुभती जनावरे वाटप करण्यासंदर्भात प्रयत्न केला जाणार असल्याचेही या बैठकीत नमूद करण्यात आले. चेअरमन नागनाथ जाधव यांनी ध्येय-धोरणांची माहिती दिली. उजळंब संस्थेच्या वतीनेही बँकांच्या मदतीने दूध उत्पादकांना कर्जाऊ जनावरे लवकर वाटप करणार असल्याचे सांगितले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी किशनराव जाधव होते. यावेळी संजय भोपळे, गजानन देशमुख, बालाजी इंद्राळे, महेश जाधव, शिवानंद इंद्राळे, अभय पडिले उपस्थित होते.

loading image
go to top