
लातूरच्या चाकूरमध्ये सोमवारी दुपारी 1.40 वाजण्याच्या सुमारास एसटीचा भीषण अपघात झाला असून यात ३६ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर एका मोटारसायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि एसटी विरुद्ध लेनमध्ये जाऊन पलटी झाली, यानंतरही घासत पुढे गेली. हा थरारक अपघात महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.